पहिल्या सत्रातच तब्बल ६४ !
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अँटिजेन टेस्ट मुळे रुग्णाचा अहवाल तात्काळ येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ झाली असून सकाळच्या सत्रातच ६४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ८२८० वर जाऊन पोहचली आहे. सकाळच्या कोरोनाच्या अहवालात परीक्षण केलेल्या ८७३ स्वॅबपैकी ६४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३१ पुरुष आणि ३३ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या ८२८० झाली आहे. त्यापैकी ४८३४ रुग्ण बरे झाले असून ३५० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ३०९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरात ५३ रुग्ण
शहरातील ५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात छावणी २, सादातनगर १, गारखेडा १, वसंतनगर १, हनुमाननगर १, शिवाजीनगर १, शिवशंकरकॉलनी १, जाधववाडी १, सुराणानगर १, रशीदपुरा १, टीव्ही सेंटर १, केसरसिंगपुरा ९, पदमपुरा १, कैलासनगर १, सिडको एन -अकरा २, हडको एन-अकरा २, नवनाथनगर २, रेल्वे स्टेशन परिसर १, रेणुकानगर, गारखेडा १, इंदिरानगर, गारखेडा ४, एन-आठ १, सातारा परिसर १, मुकुंदवाडी १, नक्षत्रवाडी २, गिरिजा विहार, पैठण रोड १, शांतीपुरा १, मिसारवाडी ७, नागेश्वरवाडी २, बाबर कॉलनी २ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील ११ रुग्ण
ग्रामीण भागात ११ रुग्ण आढळून आले. त्यात वाळूज एमआयडीसी १, हतनूर, कन्नड १, नरसिंगपूर, कन्नड १, करमाड १, गोदावरी कॉलनी, गंगापूर ४, कुंभार गल्ली, वैजापूर २, मस्की हायवे परिसर, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.













